करिअर

 करिअर “



आई वडील घरी एकटेच असतात ,दिवसभर बोर होतात ,ऑफिस मधून घरी पोहचलो फ्रेश झालो ,आईने मस्त पैकी चहा दिला ,अन दाराची बेल वाजली ,आमच्या फ्ल्याट च्या वर राहणारे जोडपे,राहुल अन पल्लवी आले होते अन हातात एक गोंडस बाळ होते …आत आले ,आई आत गेली बहुधा चहा बनवायलाच त्यांच्यासाठी …

सर एक विनंती होती,

म्हटले बोला की राहुल शेठ ,

पल्लवी म्हणाली ,भाउजी आम्ही दोघे कामावर जातो ,माझी आई होती बाळाला सांभाळायला आतावर पण ती आता रविवारी जातेय वापस ,,,आता टेंशन आलंय कि बाळाला कोण सांभाळेल ?तर विचार केला की तुमचे आई बाबा घरी एकटेच असतात दिवसभर ,बोर होत असतील ते ,तर जमले तर त्यांना विचारता का ?हवे तर आम्ही ७ हजार रुपये महिना पण द्यायला तयार आहे ..


पैस्याचे ऐकताच तळपायातली मस्तकात गेली ,पण मुखवटे इथेच कामात येतात ..

मी म्हटले वाहिनी तुम्हीच थांबा ना काही दिवस घरी ,३ महिन्याची पोर ती धड तिला बोलता येत नाही काही नाही ,तिला काही हव असले ,दुखले तर सांगता ही येत नाही ,इतक्या लहान वयात तुम्ही तिला सोडून बाहेर जाणार ..अन लहान मुलांना या वयात आईचीच गरज असते हो ..एकदा दोन तीन वर्षाची झाली की तुम्ही कामावर जाऊं शकता ना ?अन नसेलच तर राहुल ला थांबवा घरी तुम्ही काम करा …

भाउजी नाही हो माझे करिअर ….आणी राहुल कसे घरी बसतील ,

तेवढ्यात राहुल बोललाच सर काहीही काय बोलताय …

(पुरुषी अभिमान आडवा आला ,आणि तो स्वताच्या लेकी पेक्षा मोठा निघाला )

वाहिनी करिअर ? काय असते करिअर ?

माणूस काम करिअर साठी नाही करत हो …आपल्या लोकासाठी करतो ,त्यांचा बेसिक गोष्टी ,गरजा पूर्ण करता याव्या म्हणून करतो …पैसा घर चालवायसाठी लागतो ? आणि पैस्यासाठी काम करतो माणूस …आणि जिच्यासाठी हे करताय तिला असे वाऱ्यावर ठेवायचा निर्णय घेताना तुम्हाला काहीच नाही वाटले का ? 

मग बाळाला जन्मच नव्हता घालायचा ना तुम्ही ..दोघेही करिअर करतच बसायचे असते ..

त्याला का आणले या जगात …आणि बाळ रडायला लागले ,भूक लागली असावी (विजय आव्हाड आठवले )अन म्हटले बघा वाहिनी बाळ आतापासूनच बंड करतोय ,त्याचे दुधासाठी रडणे म्हणजे बंडच आहे हो आणी त्याला जितका बंड करायला भाग पाडाल आता तेवढेच तो तुमच्यापासून लांब जाईल ..

असो करिअर वगेरे असे काही नसते वाहिनी खूप नशीबवान आहात की देवाने तुम्हा स्त्रियांना बाळांतपणाच वरदान दिलंय ,मला कधी कधी देवाचा खूप राग येतो की पुरुषांना का नाही हे वरदान भेटले …मला माहिती आहे खूप यातना सहन कराव्या लागतात ,मी अंदाज ही लावू शकत नाही त्यांचा ..पण तरी तुम्ही लकी आहात वाहिनी …आणी तुमचे किंवा तुमच्या नवर्याचे करिअर जर त्या बाळापासून त्याचे आईवडील दूर ठेवत असेल तर काय कामाचे असले करिअर ?काय कामाचा तो पैसा ?


सर आम्ही इतकेच विचारायला आलो होतो ,कि तुमचे आई बाबा सांभाळतील की नाही बाळाला ,आम्ही काय करावे अन काय नाही हे आम्हाला चांगले कळते ,दुसरे कोणी बघू उगीच एवढे भाषण द्यायची गरज नव्हती ,असो येतो …


आणि निघून गेले ..खरच उगीच एवढे भाषण द्यायची गरज नव्हती ,कारण उपयोगच नाही झाला काही त्याचा …

बॉटल च्या दुधातून करिअर नामक एकटेपणाच विष तर पाजत नाही आहोत ना आपण येणाऱ्या पिढीला ?असा विचार आला मनात 

असो ,

आई खालून येतो जरा ,खाली आलो एक सिगारेट घेतली ,आणि बाजूला “बालअंगण “असा बोर्ड दिसला ,पहिल्यांदा निरखून पाहिला तो बोर्ड ..

घरी गेलो , आज माझ्या आईचा खूप अभिमान वाटत होता मला ..तिने मला ते विष पाजले नाही म्हणून …

बस बाकी काही नाही …


_नि:शब्द

Comments

Popular posts from this blog

सावित्रीबाई फुले आणि त्यांचे शिक्षणातील योगदान

टॉपर