आंतरराष्ट्रीय महिला दिन
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे
गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
अवघे विश्व वसावे
आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…”
तुला मानाचा मुजरा
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू
आणि तुच आहेस दुर्गा माता
रोमारोमात तुझ्या भरलीये
ममता आणि कणखरता
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’, रोज असावा ‘महिला दिन’
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment