भारतीय संविधानाचे शिल्पकार


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.


“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला
माणसाला स्वाभिमान शिकवला
ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले
असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होते.”

नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक


जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti)


जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश


वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ


आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर


पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956)


शिक्षण (Education):एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर ऑफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्ससंघ:समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी,अनुसुचित जाति संघ



राजनितीक विचारधारा: समानताप्रकाशन:अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट) विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )


मृत्यु (Death):6 डिसेंबर 1956 (Mahaparinirvan Diwas)


भीमराव आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.


भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत ब.याच प्रमाणात बदल केला.


भीमराव आंबेडकरांचे प्रारंभिक जीवन – Dr. Babasaheb Ambedkar Information :


डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा Dr.Br Ambedkar यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती.


3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता.यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.


भिमराव आंबेडकर Dr.Br Ambedkar महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.


इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.

डॉ. भिमराव आंबेडकरांचे शिक्षण – B R Ambedkar Education :


बाबासाहेबांचे वडिल आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणा.या विशेषाधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.


बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एलफ्निस्टन हायस्कुल ला प्रवेश घेतला अश्या पध्दतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. 1907 ला त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली.


या वेळी एक दिक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. पुढे बडौदा नरेश सयाजी राव गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले.


बाबासाहेबांना लहानपणापासुनच अभ्यासाची रूची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी होते म्हणुन ते आपल्या प्रत्येक परिक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले. 1908 ला डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी Dr.Br Ambedkar एलफ्न्सिटन काॅलेज ला प्रवेश घेउन पुन्हा ईतिहास घडवला. उच्च शिक्षणाकरता काॅलेज ला प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते.


त्यांनी 1912 ला मुंबई विश्वविद्यालयातुन पदवी परिक्षा उत्तिर्ण केली. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारसी भाषेतुन उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयातुन त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनिती विज्ञान या विषयातुन पदवी प्राप्त केली.


फेलोशिप घेउन अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात प्रवेश घेतला – Columbia University :


भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले पण येथे देखील जातीभेदाने त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यांना ब.याचदा अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांनी बराच काळ या ठिकाणी काम केले नाही कारण त्यांना त्यांच्या अंगभुत प्रतिभेकरता बडौदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना न्युयाॅर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्चपदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी 1913 ला ते अमेरिकेत निघुन गेले.


1915 साली आंबेडकरांनी B.R.Ambedkar अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान या सोबत अर्थशास्त्रातुन एम.ए ची मास्टर डिग्री प्राप्त केली. या नंतर त्यांनी ’प्राचीन भारताचे वाणिज्य’ यावर संशोधन केले. 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन आंबेडकर यांनी पीएच.डी प्राप्त केली. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ’ब्रिटिश भारतात प्रांतिय वित्त याचे विकेन्द्रीकरण’.


Comments

Popular posts from this blog

सावित्रीबाई फुले आणि त्यांचे शिक्षणातील योगदान

करिअर

टॉपर