करिअर

करिअर “ आई वडील घरी एकटेच असतात ,दिवसभर बोर होतात ,ऑफिस मधून घरी पोहचलो फ्रेश झालो ,आईने मस्त पैकी चहा दिला ,अन दाराची बेल वाजली ,आमच्या फ्ल्याट च्या वर राहणारे जोडपे,राहुल अन पल्लवी आले होते अन हातात एक गोंडस बाळ होते …आत आले ,आई आत गेली बहुधा चहा बनवायलाच त्यांच्यासाठी … सर एक विनंती होती, म्हटले बोला की राहुल शेठ , पल्लवी म्हणाली ,भाउजी आम्ही दोघे कामावर जातो ,माझी आई होती बाळाला सांभाळायला आतावर पण ती आता रविवारी जातेय वापस ,,,आता टेंशन आलंय कि बाळाला कोण सांभाळेल ?तर विचार केला की तुमचे आई बाबा घरी एकटेच असतात दिवसभर ,बोर होत असतील ते ,तर जमले तर त्यांना विचारता का ?हवे तर आम्ही ७ हजार रुपये महिना पण द्यायला तयार आहे .. पैस्याचे ऐकताच तळपायातली मस्तकात गेली ,पण मुखवटे इथेच कामात येतात .. मी म्हटले वाहिनी तुम्हीच थांबा ना काही दिवस घरी ,३ महिन्याची पोर ती धड तिला बोलता येत नाही काही नाही ,तिला काही हव असले ,दुखले तर सांगता ही येत नाही ,इतक्या लहान वयात तुम्ही तिला सोडून बाहेर जाणार ..अन लहान मुलांना या वयात आईचीच गरज असते हो ..एकदा दोन तीन वर्षाची झाली की तुम्ही कामावर जाऊं शक...